India probable playing XI for IND vs NZ 2nd T20I
esakal
Ishan Kishan Set to Miss 2nd T20I: भारत-न्यूझीलंड यांच्यातला दुसरा सामना ख्राइस्टचर्च येथे शनिवारी खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात दोन्ही संघांकडून दर्जेदार खेळ पाहायला मिळाला आणि शनिवारी तसाच सामना अपेक्षित आहे. पण, भारताला झटका बसला आहे, कारण इशान किशनला ( Ishan Kishan) दुखापतीमुळे या सामन्यात खेळता येणार नाही. भुवनेश्वर कुमार याचेही खेळणे अवघड दिसतेय, कारण त्यालाही पहिल्या सामन्यात दुखापत झाली आहे. अशा परिस्थिती भारताच्या अंतिम एकादशमध्ये बदल पाहायला मिळणे निश्चित आहे.