IND vs NZ 4th ODI : भारत-न्यूझीलंड चौथा वन डे सामना Live कुठे पाहाल? जाणून घ्या वेळ, ठिकाण अन् Tv Channel

India vs New Zealand 4th ODI live streaming in India: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या वन डे मालिकेतील चौथा सामना १३ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडमधील माउंट मॉन्गनुई येथील बे ओव्हल मैदानावर हा सामना रंगणार आहे.
Where to watch IND vs NZ 4th ODI live

Where to watch IND vs NZ 4th ODI live

esakal

Updated on: 

Where to watch IND vs NZ 4th ODI live online? भारत-न्यूझीलंड यांच्यातला तिसरा वन डे सामना पावसामुळे रद्द करावा लागल्याने मालिकेची उत्सुकता आणखी वाढली आहे. भारतीय संघ २-० असा आघाडीवर असला, तरी न्यूझीलंडला आता ही मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी मिळाली आहे. त्यात भारतीय संघात चौथ्या व पाचव्या वन डेसाठी बरेच बदल झाल्याने नवे खेळाडू काय करतात, याची उत्सुकता आहेच. शुभमन गिल, लोकेश राहुल व अंशुल कंबोज हे कसोटी मालिकेच्या तयारीसाठी वन डे संघातून बाहेर झाले आहेत. त्यांच्याजागी तिलक वर्मा, कुमार कुशाग्र व यश ठाकूर यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे चौथ्या वन डे साठी भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, हेही सर्वांना जाणून घ्यायचे आहेच.

Loading content, please wait...