Where to watch India vs New Zealand 4th T20I live
esakal
India vs New Zealand 4th T20I date time and TV channel: अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांनी निडरता काय असते हे काल दाखवून दिले. वेलिंग्टनच्या मैदानावर त्यांच्या फटकेबाजीने नुसता धुरळा उठवला होता... चौकार-टोलेजंग षटकार, हिच भाषा या दोघांच्या बॅटमधून निघत होती. त्यामुळेच १९९ धावांचे लक्ष्य भारताने ६ विकेट्स व ४० चेंडू राखून सहज पार केले. या दोघांचा खेळ पाहून आता क्रिकेट चाहत्यांना चौथ्या ट्वेंटी-२० सामन्याची उत्सुकता लागली आहे. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतल्याने आता संघाकडे गमावण्यासारखे काही नाही आणि ते आता आणखी बिनधास्त खेळतील. त्यामुळेच चौथ्या सामन्यांची तिकीटं विकली गेली आहेत.