IND vs NZ Final: ७ सामन्यांत १२.७१ ची सरासरी अन् ८९ धावा! अभिषेक शर्मा OUT, रिंकू सिंग IN? वर्ल्ड कप फायनलसाठी भारताच्या Playing XI मध्ये दोन बदल अपेक्षित

India likely playing XI for T20 World Cup 2026 final vs New Zealand: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलपूर्वी भारताच्या संघात दोन बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
India likely playing XI for T20 World Cup 2026 final vs New Zealand

India likely playing XI for T20 World Cup 2026 final vs New Zealand

esakal

Updated on

Team India predicted lineup for IND vs NZ T20 World Cup final: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने ( Abhishek Sharma) केलेली हवा फुसकी निघाली... वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७ सामन्यांत अभिषेकला १२.७१ च्या सरासरीने फक्त ८९ धावा करता आला. त्यात झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव अर्धशतकाचा समावेश आहे. भारतासाठी महत्त्वाच्या सामन्यातही त्याची बॅट थंड राहिली आणि त्यामुळे आता त्याला फायनलमध्ये खरंच खेळवायचे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारताला अंतिम सामन्यात ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडचा सामना करायचा आहे आणि या सामन्यात एखादी चूक यजमानांना महागात पडू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com