IND vs NZ Final : सूर गवसला... अभिषेक शर्माची वादळी फटकेबाजी, संजू सॅमसनसह मोडला २००९ सालचा पाकड्यांचा विक्रम

Abhishek Sharma Sanju Samson opening partnership record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप अंतिम सामन्यात भारताच्या सलामीवीरांनी ऐतिहासिक सुरुवात करून नवा विक्रम प्रस्थापित केला. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने आक्रमक फलंदाजी करताना पहिल्या विकेटसाठी ५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी उभारली.
Abhishek Sharma T20 World Cup Final India vs New Zealand

Abhishek Sharma T20 World Cup Final India vs New Zealand

esakal

Updated on

India vs New Zealand T20 World Cup Final Marathi Update News : संजू सॅमसन व अभिषेक शर्मा यांनी टीम इंडियाला दमदार सुरूवात करून दिली. नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतासाठी अभिषेकचा आत्मविश्वास परतलेला दिसला. पहिली दोन षटकं सावध खेळल्यानंतर अभिषेकने आक्रमक तोरा दाखवला आणि किवी गोलंदाजांची लय बिघडवून टाकली. या वर्ल्ड कपमधील पहिली अर्धशतकी भागीदारी या दोघांनी केली आणि २००९ सालचा विक्रम मोडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com