Jasprit Bumrah likely to be rested in India’s final group match vs Oman
esakal
भारताने आशिया चषक २०२५ मध्ये सलग दोन विजय मिळवून Super Fours मध्ये प्रवेश निश्चित केला आहे.
अ गटातील शेवटच्या सामन्यात भारताचा मुकाबला दुबळ्या ओमानशी होणार आहे.
या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याचे वृत्त आहे.
India playing XI prediction without Jasprit Bumrah vs Oman : भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेत सलग दोन विजयांची नोंद करून Super Fours मध्ये आपली जागा पक्की केली आहे. भारताने पहिल्या सामन्यात संयुक्त अरब अमिराती आणि दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धु्व्वा उडवला. आता अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात भारताला दुबळ्या ओमानचा सामना करायचा आहे. शुक्रवारी अबुधाबी येथे हा सामना होणार आहे आणि यात प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याचे वृ्त्त समोर आले आहे.