Hardik Pandya one-handed catch video Asia Cup 2025
esakal
भारताने ओमानवर २१ धावांनी विजय मिळवत आशिया चषक २०२५ मध्ये हॅटट्रिक विजय नोंदवला.
हार्दिक पांड्याने १८व्या षटकात सीमारेषेजवळ अविश्वसनीय वन-हँड कॅच घेतला.
कॅच घेण्यापूर्वी हार्दिक सपोर्ट स्टाफसोबत गप्पा मारताना कॅमेऱ्यात कैद झाला.
Hardik Pandya chatting moment caught on camera IND vs OMN : हार्दिक पांड्याने आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सर्वोत्तम झेल घेतला... ओमानविरुद्धच्या लढतीत हार्दिकने १८व्या षटकात घेतलेला वन हँडे झेल, हा सामन्याला कलाटणी देणारा ठरला. भारताच्या १८८ धावांचा पाठलाग करताना ओमानने उल्लेखनीय खेळ केला आणि १६७ धावांपर्यंत मजल मारून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आमीर कलीम व हम्माद मिर्झा यांनी अर्धशतक झळकावून भारतीय संघाच्या गोटात चिंता निर्माण केली होती. पण, हार्दिकच्या कॅचने मॅच फिरवली... हार्दिकच्या त्या अविश्वसनीय झेलचा एक Video Viral झाला आहे आणि त्यात तो कॅच घेण्यापूर्वी गप्पांमध्ये रमलेला दिसतोय...