HARDIK PANDYA’S STUNNING CATCH, ARSHDEEP SINGH CREATES HISTORY,
esakal
भारताने अपराजित मालिका कायम ठेवत ओमानवर विजय मिळवला.
ओमानने आमीर कलीमच्या अर्धशतकाच्या जोरावर १६७ धावांपर्यंत मजल मारली.
हार्दिक पांड्याने सीमारेषेवर टिपलेला अविश्वसनीय झेल सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.
India vs Oman Marathi Live Update Cricket : भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखताना शुक्रवारी ओमानवर विजय मिळवला. भारताच्या १८८ धावांच्या प्रत्युत्तरात ओमानने कडवी टक्कर देताना ४ बाद १६७ धावांपर्यंत मजल मारली. हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) १८व्या षटकात आमीर कलीमचा अविश्वसनीय झेल पकडला नसता, तर कदाचित मोठा उलटफेर पाहायला मिळाला असता. अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh) यानेही २०व्या षटकात विकेट्स घेऊन मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ओमानच्या कलीमने युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा विक्रम मोडला.