IND vs OMN : दोन बदलांसह भारत मैदानावर उतरला; सूर्यकुमार यादव खेळाडूंची नावं विसरला! म्हणाला, माझा रोहित झालाय...

India vs Oman Live Marathi Update: आशिया चषक २०२५ मधील अखेरच्या गटसामन्यात भारताने ओमानविरुद्ध इतिहास घडवला आहे. भारत हा २५० टी२० सामने खेळणारा जगातील फक्त दुसरा संघ ठरला असून पाकिस्तान (२७५ सामने) नंतर या यादीत त्यांचा क्रमांक लागतो.
India vs Oman Live Marathi Update

India vs Oman Live Marathi Update

esakal

Updated on

India vs Oman Marathi Live Update Cricket : आशिया चषक स्पर्धेच्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघ आज दुबळ्या ओमानचा सामना करणार आहे. उभय संघांमधील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे. जगातील सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळणे, ही ओमानसाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण, या सामन्यात भारताच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेलाय... आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २५० सामना खेळणारा भारत हा जगातील दुसरा संघ ठरला आहे. पाकिस्तानने सर्वाधिक २७५ T20I सामने खेळले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com