Sachin’s Handwritten Message on Surya’s Bat Ahead of IND vs PAK Title Clash
esakal
भारताने सलग सहा विजयांसह आशिया चषक २०२५च्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून प्रतिस्पर्धी पुन्हा पाकिस्तानच असणार आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पर्धेत आतापर्यंत केवळ ७१ धावा केल्या असून त्याच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त होतेय.
फायनलपूर्वी सूर्याच्या या बॅटमुळे त्याच्याकडून मोठ्या खेळीची चाहत्यांना आशा आहे.
Suryakumar to Play with Bat Signed and Blessed by Sachin Tendulkar : भारतीय संघ सलग सहा विजयांची अपराजित मालिका कायम राखताना आशिया चषक २०२५ स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळणार आहे. भारतासमोर जेतेपदाच्या लढतीत पाकिस्तानचा संघ उभा आहे. यांना आता कट्टर प्रतिस्पर्धी म्हणावं का, असा प्रश्न आहे. कारण, या पर्वात दोन्ही वेळेस भारताने शेजाऱ्यांना चीतपट दिली आहे. पण, कर्णधार सूर्यकुमार यादवला काही खास कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात सूर्यकुमारच्या फलंदाजीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.