Ramiz Raja targets Andy Pycroft
esakal
पाकिस्तान क्रिकेट अजूनही आयसीसी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करत आहे.
भारत-पाक सामना झाल्यावर पायक्रॉफ्ट यांनी कर्णधारांना हस्तांदोलन टाळण्यास सांगितल्याचा दावा पीसीबीने केला.
आयसीसीने पाकिस्तानच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून पायक्रॉफ्ट यांनाच यूएईविरुद्ध सामन्यासाठी नेमले.
Ramiz Raja statement on Andy Pycroft India bias : पाकिस्तान क्रिकेट संघ अजूनही सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर टीका करतेय. भारतीय क्रिकेटपटूंनी हस्तांदोलन न केल्याने संतापलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नौटंकी केली. पण, आयसीसी जुमानत नसल्याचे पाहून ते काल गपगुमान यूएईविरुद्ध खेळले. याही सामन्यात अँडी पायक्रॉफ्ट सामनाधिकारी होते. पाकिस्तानने कालचा सामना जिंकून सुपर ४ मधील आपले स्थान पक्के केले. आता पुन्हा एकदा २१ सप्टेंबरला India vs Pakistan सामना रंगणार आहे.