BCCI moves ICC against Pakistan’s Haris Rauf and Sahibzada Farhan after heated India vs Pakistan clash
esakal
BCCI complaint against Haris Rauf and Sahibzada Farhan : आशिया चषक २०२५ स्पर्धेत फडफडणाऱ्या पाकिस्तानला जमिनीवर आपटण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) तयारी केली आहे. INDIA VS PAKISTAN यांच्यातल्या साखळी फेरीतील पहिल्या लढतीत भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) थयथयाट केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात हॅरिस रौफ व साहिबजादा फरहान यांनी वादग्रस्त सेलिब्रेशन करून भारतीयांना डिवचले.. आता अंगावर येणार तर भारतीय त्याला शिंगावर घेतल्याशिवाय कसे राहणार... पाकिस्तानची सर्व नाटकं संपल्यानंतर आता बीसीसीआयने आक्रमक पवित्रा घेतला आहे.