Kuldeep Yadav and Tilak Varma shine as India beat Pakistan to win the Asia Cup 2025 final.
esakal
India vs Pakistan Asia Cup 2025 Final Marathi News: भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेचे जेतेपद पटकावताना पाकिस्तानचे वस्त्रहरण केले. पहिल्या दोन सामन्यांत सहज पराभूत झालेल्या पाकिस्तानी संघाने फायनलमध्ये चांगली टक्कर दिली, परंतु भारतासमोर ते टिकले नाही. आशिया चषकाच्या ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच हे संघ फायनलमध्ये समोरासमोर आले आणि त्यात सूर्यकुमार यादवच्या संघाने बाजी मारली. ४ विकेट्स घेणारा कुलदीप यादव आणि तिलक वर्मा या विजयाचे नायक ठरले. भारताने सलग सात सामने जिंकून आशिया चषकात अपराजित मालिका कायम राखली.