Haris Rauf’s wife deleted her Instagram post
esakal
Why did Haris Rauf’s wife delete her Instagram post? पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफ कालच्या सामन्यात भारतीयांचे डोकं फिरेल असाच वागला. आशिया चषक स्पर्धेतील लढतीत रौफने सुरुवातीला भारताचे सलामीवीर अभिषेक शर्मा व शुभमन गिल यांना डिवचले. त्यानंतर भारतीय चाहत्यांना पाहून हातवारे करून 'ऑपरेशन सिंदूर' ची थट्टा उडवली. आता त्याला भारतीयांनी सोशल मीडियावरून फैलावर घेतले असताना पाकिस्तानी गोलंदाजाची पत्नीनेही या वादात उडी मारली. पतीच्या समर्थनात तिने एक पोस्ट टाकली, परंतु नेटिझन्सकडून मिळालेला प्रसाद पाहून तिने नंतर ती डिलिटही केली.