Ravichandran Ashwin discusses strategy to counter Usman Tariq ahead of IND vs PAK clash.
esakal
India vs Pakistan R Ashwin strategy against Usman Tariq: भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना Super 8s च्या दिशेने कूच केली आहे. त्यांच्या मार्गात रविवारी पाकिस्तानचा अडथळा असणार आहे. भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली विजयी मालिका कायम राखली असली तरी फिरकीपटूंचा सामना करताना फलंदाज चाचपडत असल्याचे दिसले आहे.
हिच गोष्ट IND vs PAK सामन्यात भारताची डोकेदुखी वाढवू शकते. त्यात पाकिस्तानी गोलंदाज उस्मान तारिक याच्या गोलंदाजीची अॅक्शन चर्चेत आहे आणि त्याचा सामना स्मार्ट पद्धतीने कसा करता येईल, हे भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विन याने सांगितला आहे.