IND VS PAK CONTROVERSY: FAN MISCONDUCT VIDEO GOES VIRAL DURING WORLD CUP
esakal
India Pakistan World Cup off-field controversy: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच मैदानाबाहेर वातावरण तापू लागले आहे. कट्टर प्रतिस्पर्धी १५ फेब्रुवारीला कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर एकमेकांना भिडणार आहे. दोन्ही संघांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अ गटात प्रत्येकी दोन विजय मिळवले आहेत आणि या सामन्यातील विजयी संघ Super 8s मधील आपली जागा पक्की करणार आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघ ताकद लावतील, हे स्पष्ट आहे. पण, या सामन्यापूर्वीच पाकिस्तानी चाहत्याने नको तिथे 'ताकद' दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता पाकिस्तानी चाहत्यावर टीका होताना दिसतेय.