Shahid Afridi on Suryakumar Yadav handshake controversy
esakal
भारत-पाक सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन टाळल्यामुळे पाकिस्तानकडून संताप व्यक्त झाला आहे.
शाहिद आफ्रिदीने भारतीय खेळाडूंकडे खेळाडूवृत्ती नसल्याचा आरोप केला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सामनाधिकारी निलंबित करण्याची मागणी केली व कारवाई न झाल्यास बहिष्काराची धमकी दिली.
Shahid Afridi slams BCCI over lack of sportsman spirit : भारतीय संघाच्या हस्तांदोलन करण्याच्या भूमिकेने पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. शोएब अख्तर पासून ते शाहिद आफ्रिदी यांनी भारतीय संघाचाक कर्णधार सूर्यकुमार यादव व बीसीसीआय यांच्यावर टीका केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तर थेट आयसीसीकडे धाव घेत त्या सामन्यातील सामनाधिकारींना निलंबित करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करून ते थांबले नाही, तर कारवाई न केल्यास पुढील सामन्यावर बहिष्काराची धमकी त्यांनी दिलीय. त्यात आता आफ्रिदीने आगीत तेल ओतलं आहे.