Shoaib Akhtar accuses India of mixing politics with cricket
esakal
आशिया चषक २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.
भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करता जगाला दहशतवादाविरुद्ध संदेश दिला.
शोएब अख्तरने यावर नाराजी व्यक्त करत भारत राजकारण आणतोय अशी टीका केली.
Shoaib Akhtar accuses India of mixing politics with cricket IND vs PAK : टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केलं, यापेक्षा त्यांच्याशी हात न मिळवल्याचं दुःख शेजाऱ्यांना जास्त झाल्याचे दिसतेय. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेत रविवारी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. सूर्याने सामन्यानंतर पहलगाम हल्ल्यातील शहिदांना हा विजय समर्पीत केला. भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन न करून, जगाला एक मोठा संदेश दिला की दहशतवादाला थारा देणाऱ्यांसोबत असंच वागायला हवं. टीम इंडियाच्या या पवित्र्यानंतर पाकिस्तानींना मिरची झोंबणे साहजिक आहे.