IND vs PAK Asia Cup 2025 controversy
आशिया चषक २०२५ मधील भारत–पाक सामना १४ सप्टेंबरला दुबईत खेळला जाणार आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येत आहेत, त्यामुळे वातावरण तापले आहे.
सामन्याची तिकीट विक्री मंदावली असून, निम्म्याहून अधिक तिकीट अजून विकली गेलेली नाहीत.
Shreyas Iyer’s Team Boycotts Pakistan: भारत-पाकिस्तान यांच्यातला आशिया चषक स्पर्धेतील सामना १४ सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर प्रथमच दोन्ही संघ समोरासमोर येणार आहेत आणि त्यावर बहिष्काराची मागणीही जोर धरतेय... केंद्र सरकारने या सामन्याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे IND vs PAK सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण, अजूनही हा सामना होऊ नये अशीच अनेकांची इच्छा आहे. त्यात श्रेयस अय्यर नेतृत्व करत असलेल्या पंजाब किंग्सने भारत-पाकिस्तान लढतीवरून केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.