IND vs PAK Controversy
esakal
आशिया कप २०२५ सुपर-४ मध्ये भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला.
सामन्यात साहिबजादा फरहानच्या 'गनफायर सेलिब्रेशन'वरून वातावरण तापले.
हॅरिस रौफने भारतीय खेळाडू व चाहत्यांना डिवचत वादग्रस्त हावभाव केले.
Pakistan TV Panelist Shocks Fans, Suggests ‘Firing Bullets: भारताकडून वारंवार होणाऱ्या अपमानाला पाकिस्तानीही कंटाळले आहेत. आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने रविवारी पाकिस्तानला सुपर ४च्या लढतीत पराभूत केले. या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंची फालतूगिरी अधिक चर्चेत राहिली. सलामीवर साहिबजादा फरहानने 'गनफायर' सेलिब्रेशन केले आणि त्यानंतर गोलंदाज हॅरिस रौफने भारतीय फलंदाज व चाहत्यांना डिवचले. आता पाकिस्तानी वाचाळवीर वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत. IND vs PAK सामन्याच्या चर्चासत्रात एका पाहुण्याने बेताल वक्तव्य केले आहे.