Ruturaj Gaikwad scored his maiden ODI century in the 2nd ODI against South Africa
esakal
India vs South Africa 2nd ODI Live Marathi Update : ऋतुराज गायकवाडने दुसऱ्या वन डे सामन्यात खणखणीत शतक झळकावले. रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल स्वस्तात माघारी परतल्यानंतर ऋतुराज व विराट कोहली ( Virat Kohli) यांनी भारताच्या डावाला आकार दिला. ऋतुराजने चौथ्या क्रमांकावर अप्रतिम फलंदाजी केली. त्याचा प्रत्येक फटका चाहत्यांची मनं जिंकत होता आणि त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे ऋतुराजची निवड झाली आणि महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने संधीचं सोनं करताना वन डेतील त्याचे पहिले शतक पूर्ण केले.