INDIA VS SOUTH AFRICA PLAYING XI TODAY T20 WORLD CUP 2026
esakal
India vs South Africa probable playing XI today: सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियाची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खऱ्या अर्थाने आता कसोटी लागणार आहे. गट साखळी फेरीत लिंबूटिंबू संघाना पराभूत करून सुपर ८ मध्ये पोहोचलेल्या भारतीय संघासमोर आज अपराजित दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. अभिषेक शर्माचा फॉर्म, गोलंदाजांच्या कामगिरीत सातत्य नसणे, क्षेत्ररक्षणात झेल सोडण्याचे प्रमाण... याने टीम इंडिया चिंतेत असली तरी भारताला घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा आहे. पण, दक्षिण आफ्रिकेचा संघ आतापर्यंत स्पर्धेत अहमदाबाद येथे तीन सामने खेळला आहे आणि ही त्यांच्या जमेची बाब आहे. त्यामुळेच भारतीय संघ आजच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.