

India vs Sri Lanka 2nd Test
Sakal
Sri Lanka vs India 2nd Test, Marathi News: भारत विरुद्ध श्रीलंका संघात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा बुधवारी (२६ ऑगस्ट) चौथा दिवस होता. या सामन्यात श्रीलंकेला फॉलोऑननंतरही (Follow-On) आघाडी घेण्यात यश आले आहे, पण असं असलं तरी भारतीय संघाने सामन्यावरील पकड मजबूत केली आहे.
या सामन्यात चौथ्या दिवस अखेर श्रीलंकेकडे १६ धावांची आघाडी आहे. पसिंदू सुरियाबंदाराने (Pasindu Sooriyabandara) अफलातून फलंदाजी करत झुंज दिली. मात्र त्याचे शतक पुन्हा हुकलं आहे.