INDIA WIN SUPER OVER THRILLER AGAINST SRI LANKA IN ASIA CUP 2025

INDIA WIN SUPER OVER THRILLER AGAINST SRI LANKA IN ASIA CUP 2025

esakal

IND vs SL Live: टीम इंडियाचा 'Super' विजय; श्रीलंकेची कडवी झुंज! IND vs PAK लढतीपूर्वी सूर्याच्या संघाला चिमटा काढणारा सामना

Team India celebrate Super Over victory against Sri Lanka : आशिया कप 2025 मधील भारत-श्रीलंका सामना जबरदस्त रोमांचक ठरला. श्रीलंकेने शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. पथूम निसंकाने शतक झळकावून भारतीय गोलंदाजांना आव्हान दिले, त्याला कुसल परेराची साथ लाभली. या दोघांच्या भागीदारीमुळे भारताच्या संघावर दबाव निर्माण झाला होता.
Published on

India vs Sri Lanka Asia Cup 2025 Marathi Live: भारत-श्रीलंका सामना थरारक झाला. भारताने २०२ धावा चोपल्या आणि श्रीलंकेनेही लढाऊ बाणा दाखवताना ५ बाद २०२ धावा करून सामना बरोबरीत सोडवला. आशइया चषक २०२५ स्पर्धेतील ही पहिलीच सुपर ओव्हर मॅच ठरली. शेवटच्या चेंडूवर रन आऊटची संधी हर्षित राणाने गमावली नसती तर मॅच भारताने १ धावेने जिंकलीच होती. पण, क्रिकेटची हिच खरी गंमत आहे... अर्शदीप सिंगने सुपर ओव्हरमध्ये दोन धावा देत दोन विकेट घेतल्या आणि भारताने ३ धावांचे लक्ष्य सहज पार करून अपराजित मालिका कायम राखली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com