IND vs SL Semi Final : झाला हो गाजावाजा,पण...! भारताची आघाडीची फळी ढेपाळली; वैभव सूर्यवंशी ठिक खेळला, संजू-अभिषेक फेल

India top order collapse against Sri Lanka semi final : वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा अशी आक्रमक फळी मैदानात उतरल्याने चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, कठीण खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
India top order collapse against Sri Lanka semi final

India top order collapse against Sri Lanka semi final

Updated on: 

India vs Sri Lanka Semi Final Asian Games 2026: भारतीय संघाने वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Sooryavanshi), संजू सॅमसन व अभिषेक शर्मा ही तगडी फौज उतरवली. त्यामुळे आज चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळेल असे वाटले होते, परंतु भारतीय फलंदाजांनी निराश केले. श्रीलंकेच्या सहान अराछिगेने अप्रतिम गोलंदाजी करून दोन झटके दिले. वैभव तरी ठिक खेळला, परंतु अभिषेक व संजूने निराश केल्याने भारत अडचणीत सापडला. भारताने ८७ धावांत ४ विकेट्स गमावल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com