IND vs WI: आज रंगणार पहिला वनडे! यशस्वी जैस्वालला रोहितसोबत ओपनिंगला संधी मिळणार? कुठे पाहाणार सामना, जाणून घ्या

IND vs WI 1st ODI Live Streaming Details : भारत आणि वेस्ट इंडिज संघात पहिला वनडे सामना आज होणार आहे. हा सामना कुठे आणि कधी पाहाता येईल, जाणून घ्या.
India vs West Indies

Team India

Sakal

Updated on: 

एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या तयारीसाठी आजपासून (२७ सप्टेंबर) सुरू होणारी वेस्ट इंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका युवा खेळाडूंना अधिक संधी देण्याबरोबरच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या तयारीचेही मूल्यमापन करण्यासाठी महत्त्वाची आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत भारतीय संघ १४ ते २० एकदिवसीय सामने खेळण्याची शक्यता आहे. (विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नियोजित मालिका ठरल्याप्रमाणे झाली, तर वर उल्लेख केलेले सामने होतील.) त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत १५ खेळाडूंचा समतोल आणि बलवान संघ घेऊन जाण्यासाठी भारताला प्रत्येक सामन्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा लागणार आहे.

India vs West Indies
IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com