Virat Kohli shocked by fan poster during IND vs WI 2nd ODI
esakal
India vs West Indies 2nd ODI Marathi Cricket News: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीशी संबंधित एक मजेशीर फॅन-मोमेंट पाहायला मिळाला. सामन्यादरम्यान एका चाहत्याने हातात धरलेल्या पोस्टरने विराटचे लक्ष वेधून घेतले.
मागच्या सामन्यातील शतकवीर जस्टीन ग्रीव्ह्स याला दुखापतीमुळे आज खेळता आले नसले तरी जॉन कॅम्बेलने त्याची उणीव जाणवू दिली नाही. केसी कार्टी ( ९) स्वस्तात माघारी परतल्यानंतर कॅम्बेलने भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.
त्याने ६.१ षटकांत संघाच्या पन्नास धावा फलकावर चढवल्या आणि त्याने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. भारताविरुद्ध वन डेतील हे विंडीज फलंदाजाने केलेले सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. यापूर्वी २००२ मध्ये ख्रिस गेलने ३० चेंडूंत फिफ्टी मारली होती.
कॅम्बेल इथेच थांबला नाही आणि त्याने ६५ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह शतक पूर्ण केले. भारताविरुद्ध विंडीज फलंदाजाचे हे सर्वात वेगवान शतक ठरले, तर विंडीज खेळाडूकडून झालेले हे एकूण पाचवे वेगवान शतक ठरले. या विक्रमात ब्रायन लारा ( ४५ चेंडूं वि. बांगलादेश, १९९९), ख्रिस गेल ( ५५ चेंडूं वि. इंग्लंड, २०१९) हे अव्वल दोन स्थानावर आहेत. भारताविरुद्ध वेगवान शतकाचा १९९९ सालचा रिकार्डो पॉवेलचा ( ७२) विक्रम आज कॅम्बेलने मोडला.
६५ जॉन कॅम्बेल,गुवाहाटी २०२६
७२ रिकार्डो पॉवेल,सिंगापूर १९९९
७३ मार्लन सॅम्युअल्स,विजयवाडा २००२
७४ शिमरॉन हेटमायर, गुवाहाटी २०१८
८५ शिमरॉन हेटमायर, चेन्नई २०१९
गुरनूर ब्रारने भारताला ही मोठी विकेट मिळवून दिली. कॅम्बेल ६८ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह १०१ धावांवर माघारी परतला. त्यानंतर कर्णधार शे होप यालाही स्वस्तात बाद करता आले असते, परंतु विराट कोहलीने दोन झेल टाकले. शे होपने त्याचा फायदा उचलून ५१ चेंडूंत अर्धशतक झळकावले.
सामन्यादरम्यान एका चाहत्याने हातात धरलेल्या पोस्टरने विराटचे लक्ष वेधून घेतले. या पोस्टरवर, “I Skipped My Exam Just to Watch Virat Kohli” असे लिहिले होते. म्हणजेच विराट कोहलीला पाहण्यासाठी मी परीक्षा सोडून आल्याचे या चाहत्याने पोस्टरच्या माध्यमातून सांगितले. हे वाचल्यानंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली.
Virat Kohli shocked by fan poster during IND vs WI 2nd ODI
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.