IND vs WI 2nd T20: संजू सॅमसनला पुन्हा संधी की वैभव सूर्यवंशीची एंट्री? दुसऱ्या टी-२०आधी टीम इंडियासमोर मोठा पेच; श्रेयसची नजर २-० आघाडीवर

IND VS WI 2ND T20 PLAYING XI: भारत-वेस्ट इंडिज दुसऱ्या टी-२०त आमनेसामने येणार आहेत. संजू सॅमसनच्या फॉर्ममुळे वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का, याची उत्सुकता आहे. पहिल्या सामन्यातील विजयाची लय कायम ठेवत भारताचं लक्ष्य २-० आघाडीवर आहे.
IND vs WI 2nd T20

IND vs WI 2nd T20

esakal

Updated on: 

रांची : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय मिळवला. आता दोन देशांमध्ये आज (ता. ९) दुसरा टी-२० सामना रंगणार असून, या वेळी टीम इंडियाचा संघ पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. याप्रसंगी संजू सॅमसनचा फलंदाजी फॉर्म चिंतेचा विषय असून, त्याच्याऐवजी वैभव सूर्यवंशीला अंतिम ११ मध्ये संधी देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com