Mayank Yadav takes three wickets against West Indies
esakal
India vs West Indies 2nd T20I Marathi Live Updates: मयांक यादवने वेस्ट इंडिजला सुरुवातीला तीन धक्के देताना भारताला दमदार सुरुवात करून दिली होती. मयांकने पहिल्याच षटकात दोन धक्के दिले आणि त्यानंतर डेंजर रोव्हमन पॉवेलचा त्रिफळा उडवला. त्यामुळे २५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजची अवस्था ३ बाद ५८ अशी झाली होती. मात्र, याच मयांकच्या एका चुकीमुळे विंडीज आता १४ षटकांत ३ बाद १७८ धावांपर्यंत पोहोचला आणि भारताला पराभवाच्या छायेत टाकले. होप आणि शेरफाने रुदरफोर्ड यांनी आक्रमक खेळ करताना भारताची डोकेदुखी वाढवली.