Vaibhav Sooryavanshi
esakal
Vaibhav Suryavanshi to remain on bench against West Indies 2nd T20I: भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात दणदणीत विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात नमन धीरला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार श्रेयस अय्यरने खणखणीत शतक झळकावले. पण, वैभव सूर्यवंशीला बाकावर बसवल्याचा मुद्दा चर्चेत राहिला. आता IND vs WI यांच्यातला दुसरा सामना ९ तारखेला होणार आहे आणि यात भारतीय संघ अंतिम ११ खेळाडूमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. यावर दिनेश कार्तिकने आपले मत मांडले.