Yashasvi Jaiswal scored a brilliant fifty in the IND vs WI 2nd Test at Delhi and crossed 3000 international runs
esakal
India vs West Indies 2nd Test Marathi Update Cricket News : यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) सातत्य दाखवताना अर्धशतक पूर्ण केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, ५८ धावांवर लोकेश राहुलला ( KL Rahul) बाद करून विंडीजने पहिले यश मिळवले. मात्र, यशस्वी मैदानावर उभा राहिला आणि त्याने अर्धशतक पूर्ण करताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने विनोद कांबळीचा ( Vinod Kambli) विक्रम मोडला.