IND vs WI 3rd T20: भारत-वेस्ट इंडिजचा तिसरा टी-२० सामना कुठे अन् कधी पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

IND vs WI 3rd T20 Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज तिसरा टी-२० सामना कधी आणि कुठे होणार? सामन्याची वेळ, नाणेफेक, TV चॅनेल आणि मोबाइलवर LIVE Streaming कुठे पाहायचं, जाणून घ्या.
IND vs WI 3rd T20

IND vs WI 3rd T20

esakal

Updated on: 

IND vs WI 3rd T20 Live Streaming: शुक्रवारी झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे.

या मालिकेतील शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४९ धावा केल्या होत्या. यामध्ये संजू सॅमसनने ८४ धावांची खेळी केली. मात्र, एवढी मोठी धावसंख्या उभारूनही भारतीय संघाला सामना जिंकता आला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com