

Dhruv Jurel - Tilak Varma | India A vs New Zealand A
Sakal
New Zealand A vs India A 3rd Test: भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ संघात सध्या तिसरा अनधिकृत कसोटी सामना सुरु आहे. हा सामना आगामी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर भारतीय संघाने मोठी आघाडी घेण्यात यश मिळवले आहे.
भारताने पहिल्या डावात साडेचारशे धावांचा टप्पा ओलांडला असून दुसऱ्या दिवशी साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर या सर्वांनीच दमदार फलंदाजी केली.