
विराट कोहली - रोहित शर्मा यांच्या कसोटी निवृत्तीनंतर त्यांची जागा भारतीय संघात कोण घेणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पण आता विराटची जागा घेण्यासाठी मात्र मधल्या फळीसाठी एक चांगला पर्याय मिळाला असल्याचे दिसत आहे.
सध्या भारताचा अ संघ इंग्लंड दौऱ्यावर असून चार दिवसीय सामने खेळत आहे. शुक्रवारपासून (३० मे) पहिला सामना सुरू झाला असून या सामन्यात करुण नायरने द्विशतक ठोकले आहे. त्याचबरोबर आता त्याने विराटच्या जागेसाठी दावेदारी ठोकली आहे.