India A squad for Rising Stars Asia Cup announced: भारताच्या निवड समितीने आगामी रायझिंग स्टार आशिया चषक स्पर्धेसाठी भारत अ संघ जाहीर केला आहे. कतार येथे १४ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. Emerging Asia Cup स्पर्धा Asia Cup Rising Stars Championship या नव्या नावाने क्रिकेट चाहत्यांच्या भेटीला येत आहे. जितेश शर्माच्या नेतृत्वाखाली भारत अ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे आणि १६ नोव्हेंबरला भारत-पाकिस्तान ( india vs pakistan) असा सामना रंगणार आहे.