

Tilak Varma and Kumar Kushagra Rescue India A With a Huge Partnership
esakal
Tilak Varma and Kumar Kushagra Rescue India A With a Huge Partnership: रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ स्पर्धेत भारत अ संघाचा नेपाळविरुद्ध सामना खेळवला जात आहे. या सामन्यात नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. भारताकडून १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची सुरुवात केली.
मात्र, सुरुवातीलाच भारताने तीन विकेट्स गमावल्या. त्यानंतर कर्णधार तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांनी डाव सावरत मोठी भागीदारी केली. या दोघांच्या शतकांच्या जोरावर भारतीय संघाने ३३२ धावांचा डोंगर उभारला.