

IND vs PAK Live
esakal
When and where to watch India A vs Pakistan A live in India?: रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ स्पर्धेत भारत अ संघाने नेपाळविरुद्ध दणदणीत विजय मिळवत स्पर्धेची सुरुवात केली. भारतीय संघाचे नेतृत्व तिलक वर्माकडे असून रिंकू सिंग उपकर्णधार आहे.
नेपाळविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने आपल्या कामगिरीने प्रतिस्पर्धी संघांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. आता पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचा पुढील सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान अ संघाविरुद्ध होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.