IND A vs SL A, ODI: शेवटच्या चेंडूवर मोठा ड्रामा अन् मग सुपर ओव्हरचा थरार... अखेर भारताचा सलग दुसरा पराभव; आता फायनल कशी गाठणार?

India A Suffer Super Over Defeat vs Sri Lanka A: तिरंगी वनडे मालिकेत सोमवारी भारत अ आणि श्रीलंका अ संघात अत्यंत रोमांचक सामना झाला. या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये भारताचा पराभव झाला. पण यामुळे आता भारतासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
Tri - Series ODI

India A vs Sri Lanka A

Sakal

Updated on

तिलक वर्माच्या नेतृत्वातील भारतीय अ संघ सध्या श्रीलंकेत तिरंगी वनडे मालिका खेळत आहे. मात्र या मालिकेत भारताची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. सोमवारी भारतीय संघाला श्रीलंका अ संघाविरुद्ध रोमांचक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. हा भारताचा मालिकेतील सलग दुसरा पराभव आहे. या आधी भारताला अफगाणिस्तान अ संघाकडूनही पराभवाचा सामना करावा लागला होता.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २६५ धावा करत श्रीलंकेसमोर २६६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण श्रीलंका संघही ५० षटकात ९ विकेट्स गमावत २६५ धावाच करू शकले, त्यामुळे सामन्यात बरोबरी झाली. त्यानंतर सुपर ओव्हर झाली. पण त्यात श्रीलंकेने दिलेल्या १७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला १० धावाच करता आल्या.

Tri - Series ODI
IND A vs SL A: दुष्काळात तेरावा महिना! विपराज निगमच्या चुकीचा फटका; भारताच्या धावा ICCने कमी केल्या, नेमकं काय घडलं?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com