IND A vs SL A, Test: सुदर्शनचं शतक, तर गुरनूर ब्रारच्या १० विकेट्स, भारताचा श्रीलंकेवर चौथ्याच दिवशी दणदणीत विजय

IND A vs SL A Test Match Results: भारतीय अ संघासाठी श्रीलंका दौरा यशस्वी ठरला आहे. रविवारी भारतीय अ संघाने श्रीलंका अ संघाविरुद्ध कसोटी सामन्यात १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.
Sai Sudharsan - Gurnoor Brar | India A vs Sri Lanka A

Sai Sudharsan - Gurnoor Brar | India A vs Sri Lanka A

Sakal

Updated on

IND A vs SL A Test news: भारतीय अ संघासाठी श्रीलंका दौरा यशस्वी ठरला आहे. तिरंगी मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय अ संघाने दोन सामन्यांची कसोटी मालिकाही १-० अशा फरकाने जिंकली आहे. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसरा सामना भारतीय अ संघाने १० विकेट्सने जिंकला. या सामन्यात साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, गुरप्रीत ब्रार, सारांश जैन यांचा मोलाचा वाटा राहिला.

या सामन्यात दुसऱ्या डावात श्रीलंकेला भारतासमोर फक्त ३३ धावांचे लक्ष्य ठेवता आले होते. या लक्ष्याचा पाठलाग चौथ्या दिवशी भारताने एकही विकेट न गमावता ६.२ षटकातच पूर्ण केले. साई सुदर्शन २२ चेंडूत ४ चौकारांसह २५ धावांवर नाबाद राहिला. तसेच अमन मोखाडे १६ चेंडूत ११ धावांवर नाबाद राहिला.

Sai Sudharsan - Gurnoor Brar | India A vs Sri Lanka A
IND A vs SL A: साई सुदर्शनचं आणखी एक खणखणीत शतक! श्रीलंकेविरुद्ध पुन्हा केला धमाका; भारताच्या कसोटी संघासाठी मजबूत दावेदारी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com