

Sai Sudharsan century
esakal
India A vs Sri Lanka A Sai Sudharsan century: भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' (India A vs Sri Lanka A)यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी साई सुदर्शनने(Sai Sudharsan) पुन्हा एकदा शानदार शतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पहिल्या सामन्यातही त्याने १३२ धावांची खेळी केली होती. आता दुसऱ्या सामन्यातही त्याने शतक ठोकत आपला दमदार फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं.