

India Win 5th Asian Games Men's Hockey Gold Medal
Sakal
India Win 5th Asian Games Men's Hockey Gold Medal: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने शनिवारी (३ ऑक्टोबर) सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय पुरुष संघाने सलग दुसऱ्यांदा तर एकूण पाचव्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या सुवर्णपदकासह भारतीय संघाने २०२८ ऑलिम्पिकसाठीही (LA Olympics 2028) पात्रता मिळवली आहे.
विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघानेही सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्यामुळे यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकीमध्ये भारताचेच वर्चस्व सिद्ध झाले आहे.
तसेच पहिल्यांदा असे झाले आहे की भारतीय पुरुष संघाने सलग दोनदा सुवर्णपदक आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकेल आहे. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी एकाच पर्वात सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
शनिवारी भारतीय पुरुष हॉकी संघाने मलेशियाला ५-१ गोल फरकाने पराभूत करत हे सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे मलेशियाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. कांस्य पदक पाकिस्तानने कोरियाला पराभूत करत जिंकले आहे.
दरम्यान, सलग दोन आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा हरमनप्रीत पहिला कर्णधार ठरला. तसेत तीनवेळा आशियाई क्रीडा स्पर्धत सुवर्णपदक जिंकणारा मनप्रीत पहिलाच भारतीय कर्णधार ठरला. त्याने २०१४, २०२३ आणि २०२६ असे तीनवेळा सुवर्णपदक जिंकले.