Team India
Sakal
Cricket
IND vs NZ: भारताने नागपूरचं मैदान मारलं! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या T20I सामन्यात दणदणीत विजय, ग्लेन फिलिप्सची फिफ्टी व्यर्थ
India Won 1st T20I against New Zealand: भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध नागपूरला झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत आघाडी घेतली आहे.
India beat New Zealand in 1st T20I: टी२० मालिकेला भारतीय संघाने दणक्यात सुरुवात केली आहे. बुधवारी (२१ जानेवारी) नागपूरला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारताने ४८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारताच्या विजयात अभिषेक शर्मा (Abhishek Sharma), रिंकू सिंग (Rinku Singh), वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) यांचे मोलाचे योगदान राहिले.
भारताने न्यूझीलंडसमोर (IND vs NZ) विजयासाठी २३९ धावांचे विक्रमी लक्ष्य ठेवले होते. पण न्यूझीलंडला २० षटकात ७ बाद १९० धावा करता आल्या. ग्लेन फिलिप्सचे (Glenn Phillips) अर्धशतक मात्र व्यर्थ ठरले.

