Asia Cup 2025 Super 4 fixtures and full schedule
esakal
IND vs PAK Asia Cup 2025 Super 4 match timing : भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. सूर्यकुमार यादवच्या संघाने अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात ओमानचा पराभव केला. ओमानकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली आणि त्याचे सर्वांनी कौतुकही केले. सुपर ४ च्या लढतीत भारताला आता रविवारी पाकिस्तानचा सामना करायचा आहे. त्या सामन्याची तयारी म्हणून भारतीय खेळाडूंनी ओमानविरुद्ध सराव करून घेतला. यापूर्वीच्या दोन सामन्यांत भारताच्या फलंदाजांना पुरेशी संधी मिळाली नव्हती. त्यामुळेच आज सूर्याने स्वतःला डग आऊटमध्ये बसवले अन् कुलदीप यादवपर्यंत सर्वांना फलंदाजीला पाठवले.