

India vs Pakistan | U19 World Cup 2026
Sakal
India Beat Pakistan in U19 World Cup: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या सुपर सिक्समधील शेवटच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला ५८ धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने बी गटात अव्वल स्थानासह उपांत्य फेरीतील स्थानही निश्चित केले.
तसेच १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील वचपाही काढला. पाकिस्तानचे या पराभवासह १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. भारताने १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये (U19 World Cup) सलग पाचव्यांदा पाकिस्तानला पराभूत केले आहे.