

Team India
Sakal
१९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या सराव सामन्यात बुधवारी (४ फेब्रुवारी) भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३० धावांनी विजय मिळवला. भारताचा हा या स्पर्धेआधीचा एकमेव सराव सामना होता. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर हा सराव सामना झाला. या सराव सामन्यात भारताच्या फलंदाजांसोबतच गोलंदाजांकडूनही चांगली कामगिरी झाली.
या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर (India vs South Africa) २४१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने २० षटकात ७ बाद २१० धावा केल्या.