

Sanju Samson | Abhishek Sharma - Ishan Kishan | T20 World Cup 2026
Sakal
Ishan-Abhishek to Open in T20 WC 2026: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाची मोहिम ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, पण त्याआधी बुधवारी (४ फेब्रुवारी) भारताचा सराव सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवला जात आहे.
नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सराव सामन्यात भारताचे (Team India) जवळपास सर्वच फलंदाज चमकले आहेत. या सामन्याने अभिषेक शर्मासोबत (Abhishek Sharma) सलमीला कोण येणार यावरही जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.