ENG vs IND, 2nd Test: 'बुमराहची अनुपस्थिती जाणवेल, पण आम्ही...', कर्णधार शुभमन गिल दुसऱ्या कसोटीपूर्वी काय म्हणाला?

Shubman Gill on Jasprit Bumrah Availability: भारताला उद्यापासून इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी खेळायची आहे. या सामन्यात बुमराहच्या उपस्थितीबाबत कर्णधार शुभमन गिलने महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत.
Gautam Gambhir - Shubman Gill | Jasprit Bumrah
Gautam Gambhir - Shubman Gill | Jasprit BumrahSakal
Updated on

भारतीय क्रिकेट संघाला बुधवारपासून इंग्लंडविरुद्ध अँडरसन-तेंडुलकर मालिकेतील दुसरा सामना खेळायचा आहे. पहिल्या कसोटी सामन्यात हेडिंग्लेमध्ये भारताला पराभवाचा धक्का बसला होता. पण या सामन्यानंतर साधारण आठवडाभराने दुसरा सामना होत आहे. त्यामुळे मिळालेल्या वेळेचा उपयोग करून आता दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ सज्ज आहे.

मात्र या कसोटी सामन्यापूर्वी सर्वात मोठा प्रश्न आहे तो वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही. कारण यापूर्वीच भारतीय संघव्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की ३१ वर्षीय बुमराह ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तीनच सामने खेळणार आहे.

Gautam Gambhir - Shubman Gill | Jasprit Bumrah
Viral Video: बायकोसमोर कोणाचं चालतंय! Jasprit Bumrah ला फलंदाज घाबरतात; पण, पत्नी संजनाने केली त्याची बोलती बंद...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com