
भारतीय क्रिकेट संघला इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे बुधवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून पुनरागमन करण्याचं आव्हान भारतीय संघासमोर आहे.
पहिल्या कसोटीत भारतीय संघाची गोलंदाजी फारशी यशस्वी ठरली नव्हती, त्यामुळे गोलंदाजी फळीत दुसऱ्या कसोटीत बदल होणार का? असा प्रश्न होता पण आता भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोईशेट यांनी याबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.