
भारतासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही चागंली कामगिरी केली होती. हेडिंग्लेमध्ये झालेल्या या सामन्यात त्याने पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या.
मात्र तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पाचपैकी तीन सामनेच खेळणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तो बुधवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. आता याबाबतच भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोईशेट यांनी अपडेट्स दिल्या आहेत.