
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत खेळत आहे.
दरम्यान, शमी मैदानात चांगली कामगिरी करत असला, तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र सातत्याने चढ-उतार येत असल्याचे दिसत आहे. आता त्याच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याला ईमेलद्वारे जीव मारण्याची धमकी आल्याचे समजत आहे.